नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवामान विभागाने(India Meteorological Department) आज सांगितले आहे की, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस पुढील 24 तास सुरु राहणार आहे. हेच कारण आहे की, हवामान विभागाने(IMD) या राज्यांसाठी रेड अलर्ट दिला आहे. IMD नुसार, 1 जून पासून सुरु झालेल्या मान्सून सीजनमध्ये भारतात आतापर्यंत 5 टक्के कमी पाऊस झाला आहे. पावसामुळे केरळचं कोची एअरपोर्टही रविवारी बंद करण्यात आलं आहे.
#Monsoon | IMD ने कई राज्यों के लिए अलर्ट जारी किया pic.twitter.com/WWapfWZ5OA
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) August 9, 2019
9 ऑगस्ट रोजी गुजरात, केरळ आणि माहे, दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात जास्त पावसाचा अंदाज आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि गोवा, तमिळनाडू, पुदुच्चेरी अँड कराईकल, दक्षिण-पश्चिम राजस्थान आणि अंदमान आणि निकोबार आयलँड मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकचा अंतर्गत भाग, विदर्भ, पूर्व मध्य प्रदेश आणि जम्मू काश्मीर मध्ये अतिवृष्टी होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 10 ऑगस्ट रोजी गुजरात, कोस्टल कर्नाटक आणि केरळ आणि माहे मध्ये अतिवृष्टी तर दक्षिण राजस्थान, दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकचा अंतर्गत भाग, तमिळनाडू, पुदु्च्चेरी आणि कराईकल लक्षद्वीप आणि अंदमान व निकोबार आयलँडमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.