बहुजननामा ऑनलाइन टीम – साऊथमधील फेमस अॅक्ट्रेस तमन्ना भाटीया (Tamanna Bhatia) आपल्या अॅक्टिंगसोबतच आपल्या लुकसाठीही फेमस आहे. तमन्नाला कोरोनाची लागण झाली होती. यावर तिनं यशस्वीरित्या मात केली आहे. अलीकडेच्या दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपला अनुभव सांगितला आहे.
तमन्ना म्हणाली, “माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला हे एकून मी खूप घाबरले होते. कारण कोरोनामुळं मृत पावणाऱ्या लोकांची संख्या त्यावेळी दिवसेंदिवस वाढत होती. त्यामुळं मलाही मृत्यूची भीती सतावत होती. परंतु डॉक्टरांनी माझा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी योग्य उपचार करून मला बरं केलं.”
तमन्नाच्या आधी तिच्या आई वडिलांनाही कोरोनाची लागण झाली होती. यानंतर संपूर्ण कुटुंब क्वाॅरंटाईन करण्यात आलं होतं.
तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत बोले चूडिया या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय सीटीमार या तेलगू सिनेमातही ती काम करताना दिसणार आहे. तमन्नानं चांद सा रोशन चेहरा या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मनासारखं काम न मिळाल्यानं तिनं तेलगू आणि तमिळ सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. तिनं अनेक सिनेमात काम केलं आहे. हिंमतवाला, द हमशकल्स, खामोशी, बाहुबली, रिबेल, से रा नरसिंहा रेड्डी, अयान, पैरा, सिरुथई, धर्मा दुरै असे अनेक तिचे सिनेमे सांगता येतील.