बहुजननामा ऑनलाईन : अनेक वेळा आपल्या फोनची मेमरी फुल होते आणि त्यानंतर काहीच करता येत नाही. त्यामुळे आपला फोन स्लो होतो आणि अनेक समस्या येतात. सध्या १० ते १२ हजार रुपयापर्यंत असे अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत ज्यामध्ये चांगल्या पिक्सलचे कॅमेरे असतात. फोनमधील फोटो आणि व्हिडिओमुळे मेमरी फुल होते. त्यानंतर तुमचा मोबाईल हँग होतो आणि मग त्यामधील काही अॅप काम करत नाहीत.
अशा वेळी तुम्ही तुमच्या मोबाइलला मधील काही फोटो आणि व्हिडीओ महत्वाचे असल्यामुळे डिलिट करू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा काही ट्रिक्स ज्यामुळे तुम्ही फोनमधील फोटो आणि व्हिडिओ किंवा तुम्हाला आवश्यक असलेल्या फाईल्स डिलिट न करता देखील जागा निर्माण करू शकता.
तुमच्या फोनमध्ये जागा करण्यासाठी या गोष्टी जाणून घ्या
१] फोन मधील बॅकअपमोड या पर्यायावर जा आणि हाय क्वालिटी हा पर्याय निवडा
२] त्यानंतर गुगल फोटो अॅप ओपन करा
३] या अॅपच्या उजव्या कोपऱ्यावर असेल्या ३ डॉटवर क्लिक करा
४] त्यानंतर सेटिंग्स या पर्यायावर जा
५] त्यानंतर बॅकअपमोड हा पर्याय निवडून त्यातील हाय क्वालिटी या पर्यायावर क्लिक करा
६] त्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे बॅकअप डिवाइस फोल्डर्स या ठिकाणी जाऊन सर्व फोल्डर्स सिलेक्ट करा ज्यांना तुम्हाला या बॅकअप मध्ये ठेवायचे आहे.
तुमच्या फोनमध्ये अशा प्रकारे अनलिमिडेट जागा मिळवण्यासाठी गुगल फोटोज अॅपचे सर्वात अपडेट व्हर्जन (4.15) डाऊनलोड करा. अशा प्रकारे बॅकअप घेताना इंटरनेट कनेक्शनची गरज लागते.