बहुजननामा ऑनलाईन – मोदींचे बालपण हे अत्यंत गरिबीत गेले. ते लहान असताना त्यांच्याकडे कपडे धुण्याची साबण आणायला ही पैसे नसायचे. तेव्हा ते पानांवर गोळा झालेलं मीठ जमा करून त्या मिठाने अंघोळ करत असत. असे मोदींनी सांगितले. मोदीं लहाणपणी जे कपडे घालत होते. त्याच्याबद्दल अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. यावर मोदी म्हणतात की लहानपणापासूनच मला टापटीप रहायला आवडतं. तेव्हा इस्त्री मिळत नसल्याने मी तांब्याच्या भांड्यात गरम कोळसा टाकून कपडे इस्त्री करायचो.
तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मी रेल्वे स्टेशनवर चहा विकला होता, असही मोदींनी सांगितलं. बियर ग्रिल्ससोबत बोलत असताना ते म्हणाले की माझे वडील रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. तेव्हा मी शाळेतून आल्यानंतर वडिलांना विकायला मदत करायचो. बियर ग्रिल्सने जंगलात फिरत असताना एक लाकूड आणि चाकुच्या मदतीनं हत्यार तयार केलं आणि ते मोदींकडे दिलं तेव्हा ते म्हणाले की, कोणाला मारणं माझ्या संस्कारात नाही. पण सुरक्षेसाठी ते मी माझ्याजवळ ठेवतो.
यानंतर मोदी म्हणाले की बियर ग्रिल्ससोबतचा हा शो म्हणजे माझी मागील १८ वर्षातील पहिली सुट्टी आहे असंही मोदी म्हणाले. तसेच पंतप्रधान होण्याचं तुमच्या मनात कधी आलं असा प्रश्न विचारला असता मोदी म्हणाले की, मी १३ वर्षे एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यानंतर देशातील नागरिकांनीच मला पंतप्रधान केलं. मोदी म्हणाले की, लहान असताना जेव्हा पाऊस पडायचा तेव्हा वडील २५-३० पोस्टकार्ड आणायचे आणि नातेवाईकांना पावसाबद्दल कळवायचे. आम्हाला हा विनाकारण खर्च वाटायचा पण आता कळतंय की जेव्हा ते पाऊस आल्याचं सांगायचे तेव्हा नातेवाईकांना बरं वाटायचं.
निसर्गावर प्रेम करण्याचं बाळकडू मला घरीच मिळालं असंही मोदींनी सांगितलं. यावेळी त्यांनी त्यांच्या आजीची एक आठवण सांगितली. ते म्हणाले की काकांनी लाकडाचा व्यवसाय करण्याचं ठरवलं हे आजीला समजलं तेव्हा ती नाराज झाली. नाराजीचं कारण विचारल्यावर आजी म्हणाली की उपाशी मरू पण लाकूड विकायचं काम नाही करणार, लाकडातही जीवन आहे. त्या झाडाला कापून घर चालवणं योग्य नाही, असं मोदी म्हणाले. मोदींनी या कार्यक्रमातून नागरिकांना एक संदेशही दिला. ते म्हणाले की आपण निसर्गाकडून काहीही घेण्यापूर्वी हा विचार करायला हवा की ५० वर्षानंतरची पिढी त्यांच्या हक्काची हवा प्रदुषित का करत आहात असा प्रश्न विचारेल. त्यासाठी निसर्गाचं संवर्धन करायलं हवं. पंतप्रधान मोदींच्या शिक्षणावरून आतापर्यंत अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. त्यांच्या डीग्रीचीही कायम चर्चा होत असते. बियर ग्रिल्सनं मोदींना त्यांच्या शालेय जीवनाबद्दल विचारलं असता मोदी म्हणाले की, मी शाळेत खूप हुशार विद्यार्थी नव्हतो, असेही मोदींनी सांगितले.