मुंबई बहुजननामा ऑनलाईन – राज्यात विविध संवर्गांच्या आरक्षणामुळे वैद्यकीय पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्या आहेत. त्या वाढवून घेतल्या जाणार आहेत. तसेच खुल्या गटातील ज्या विद्यार्थ्यांचे यावर्षी प्रवेश होऊ शकले नाहीत. त्यांनी खासगी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा. त्यांच्या यंदाच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपुर्तील सरकारकडून करण्यात येणार आहे. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. रविवारी सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन चळवळीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
आर्थिक व शैक्षणिक मागास वर्गातील मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्याने खुल्या वर्गातील पालक व विद्यार्थ्यांमुळे मोठा अंसतोष निर्माण झाला आहे. वैद्यकिय अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु झाल्याने विद्यार्थी पालकांना नव्या आरक्षणाचा फटका बसणार असल्याचे लक्षात आले नाही. महिन्यात अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यावर खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्याचे लक्षात येईल त्यामुळे असंतोषाचा भडका उडेल. अशी भीती या शिष्टमंडळाने व्यक्त केली. तसेच सरकारने याप्रकऱणात तातडीने लक्ष घालावे. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपुर्ती योजना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकातील विद्यार्त्य़ांसाछी ६०४ अभ्यासक्रमांमध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेतून अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के शुल्क प्रतिपुर्ती योजना राबविली जाणार आहे. तसेच ओबीसी, आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षण घेता येते. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.