मिरज बहुजननामा ऑनलाईन – समविचारी पक्षासोबत युती करण्यासाठी बहुजन रयत पार्टीची बोलणी सुरु असून आघाडी करताना काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. म्हणून बहुजन रयत पार्टी स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी जोमाने करावी असे आवाहन पार्टीच्या वतीन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र मधील राज्य पदाधिकारी, सर्व जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी यांची महत्वपुर्ण बैठक रविवारी पार पडली. या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. दिलीप मोहिते यांनी बोलताना म्हणाले की,महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणूक अनुषंगाने बहुजन रयत पार्टीचे आमदार जास्ती जास्त कसे निवडून येतील यासाठी बहुजन रयत पार्टीचे काम जोमाने वाढवणे गरजेचे आहे.
बहुजन रयत पार्टी निडणुकीत जास्ती जास्त सभा कशा व कुठे कुठे घेणार,२८८ उमेदवार चारित्र्यवान,सर्वगुण सम्पन्न असले पाहिजे, निवणुकीत पुरेसे पैसे खर्च करण्याची ताकद नसेल तरी तो प्रसिद्ध असला पाहिजे जनतेमध्ये चर्चेत असलेला पाहिजे. अशा उमेदवाराच्या चाचपणीसाठी बहुजन रयत पार्टीही राज्यासाठी समिती यावेळी स्थापन करण्यात आली.
बहुजन रयत पार्टी ही आठरा पगड जातीची आहे. ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वच समाज मोडतात. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या कुठल्या जातीवादी पक्षाचा लढा न लढवता जनतेच्या हितार्थ निवडणूक लढवायची आहे. यावेळी अनेक उमेदवारांनी उमेदवारी मागितली व पक्ष निधी म्हणून प्रत्यक उमेदवारांनी पार्टीसाठी ५०००रुपये दिलीप मोहिते यांच्याकडे देणार असल्याचे देखील यावेळी अनेकांनी सांगितले.
बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्राचार्य. अशोक लोखंडे(पंढरपूर), प्रा.डॉ.विशाल जाधव (इस्लामपूर),सतीश खामकर(सांगली),महाराष्ट्र राज्य खजिनदारवनिता सकटे(मिरज), शिवकुमार हेगाना(सांगली) यांची निवड करण्यात आली त्याच बरोबर ह्या कमिटी मध्ये कोल्हापूर, सांगली,सातारा,मिरज,पंढरपूर ह्या भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. ह्या बैठकीला माधव मेकेवाड नांदेड (महाराष्ट्र राज्य महासचिव) यांचे विशेष असे मार्गदर्शन लाभले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी हेमंत मोहिते,वनिता सकटे मॅडम यांनी मेहनत घेतली. ह्या कार्यक्रमात उपस्थित राज्यकमिटीचा सर्वच पदाधिकार्यांचा शेवटी समारोप आभार खामकर यांनी केले.राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते माधव मेकेवाड(नांदेड) यांना महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे महासचिव असे महत्वाचे पदाचे नियुक्ती पत्र देऊन गौरव करण्यात आला आहे.