नवी दिल्ली – नोकरी करण्यामध्ये ख्रिश्चन आणि शीख समाजातील पुरुषांपेक्षा या समाजातील महिलांचे प्रमाण जास्त आहे. तसेच शीख समुदयातील 51 टक्के लोक हे स्वयंरोजगार करतात अशी आकडेवारी नुकतीच केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाकडून मनुष्यबळ सर्वेक्षण अहवाला प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार वेगवेगळ्या धर्मातील रोजगाराचे चित्र स्पष्ट झाले आहे. या अहवालानुसार मुस्लिम समाजातील लोक हे स्वयंमरोजगारमध्ये सर्वाधिक आहेतच शिवाय रोजंदारीवर काम करणाऱ्यांमध्येही याच समाजातील लोक आघाडीवर आहेत.
२०१७-१८ च्या अहवालानुसार ३६.६ टक्के ख्रिश्चन हे उदरनिर्वाहासाठी नोकरीच करतात. तर शिखांचे प्रमाण २७.६ टक्के इतके आहे. हिंदु धर्मात देखील पुरुषांपेक्षा महिलांचे रोजदांरी करण्याचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागात राहणारे २९ टक्के हिंदू लोक हे रोजंदारीची कामे करतात. तर हेच प्रमाण मुस्लिम समाजात ३१ टक्के इतके आहे. शीखांमध्ये रोजंदारी कऱणाऱ्यांचे प्रमाण ९.५ टक्के इतके कमी आहे.
सांख्यिकी मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आकडेवारीमुळे समाजातील विविध धर्मातील लोकांची आर्थिक परिस्थिती समजण्यास सरकारला मदत होणार आहे. त्यामुळ प्राधान्याने कोणत्या समाजाला कीती मदत द्यायची याचा क्रम देखील सरकराला निश्चित करण्यास मदत होणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. रोजगाराच्या कमी होणाऱ्या संधींमुळे देखील मोठ्या प्रमाणात लोक स्वयंरोजगाराकडे वळत आहेत, शिवाय पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त कष्टाची कामे करावी लागत असल्याचे चित्र या आकडेवारीतुन समोर येते आहे.