सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह ठरलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कप बशी या चिन्हावर निवडणूक लढवतील. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत चिन्ह म्हणून कप बशीला मान्यता देण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापुर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत .
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूर या दोन मतदारसंघांमधून आगामी लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला असून. राज्यातील सर्वच्या सर्व ४८ मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार आहे.
यापैकी वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबादच्या जागेवर एमआयएमनचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत
न्हावर, लढणार, वंचित बहुजन आघाडी