बहुजननामा ऑनलाईन – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडलं जाणार आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या यांचा जीवनप्रवास दाखवणारी नवी मालिका सुरू होत आहे.या मालिकेत अभिनेता सागर देशमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहेत.
देशमुख यांनी यापूर्वी पु.लं देशपांडे यांची भूमिका साकारली होती. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. या महामानवाचे विचार आजही तेवढेच परिणामकारक आणि स्फूर्तिदायी ठरतात हेच विचार देशभरात पोहोचवण्याच्या हेतूने स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेची निर्मिती केली आहे.
सागर देखमुख यांची प्रतिक्रिया –
एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय असं म्हणत सागरनं आपला आनंद व्यक्त केला आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तुत्व खरंच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने बाबासाहेब उलगडत आहेत.’
या मालिकेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण ते महामानवापर्यंतचा प्रवास पाहायला मिळणार आहे. टीव्ही हे अत्यंत प्रभावशील माध्यम असल्यामुळे प्रत्येक जनमानसात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खोलवर रुजला जाईल’ असा विश्वास स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हाच प्रेरणादायी जीवनपट मालिकेच्या रुपाने १५ एप्रिलपासून रात्री ९.०० वाजता स्टार प्रवाहवर पहायला मिळणार आहे.