नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकियाने मागील वर्षी भारतीय बाजारात त्यांचा स्मार्ट टीव्ही आणला असून फ्लिपकार्टवर फ्लॅश सेलसाठी उपलब्ध आहे. जर तुम्हाला नोकिया स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर आज दुपारी १२ वाजता विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. याचे खास फिचर म्हणजे ५५ इंचाचा ४ के डिस्प्ले दिला असून उत्तम साऊंडसाठी यात जेबीएलच्या ऑडिओ तंत्रज्ञानाचा यात उपयोग केला गेला आहे. फ्लिपकार्टवर त्याच्या खरेदीसह अनेक खास ऑफर्सचा फायदा घेऊ शकता.
मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये नोकिया टीव्हीला भारतीय बाजारात ४१,९९९ रुपयांसह सादर केले होते. हा टीव्ही फक्त फ्लिपकार्टवरच खरेदीसाठी उपलब्ध आहे. यावर उपलब्ध असलेल्या ऑफर्समध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्हीसह एक वर्षाची वॉरंटी मिळणार असून २,९९९ रुपयांमध्ये ३ वर्षाची वॉरंटी मिळू शकते. तसेच एचएसबीसी डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंट्सवर १० टक्के त्वरित सूटही दिली जात आहे.
नोकिया स्मार्ट टीव्हीमध्ये ५५ इंचाचा ४ के डिस्प्ले असून हे डिव्हाइस प्यूरएक्स क्वाड कोर प्रोसेसरसह सुसज्ज आहे. Intelligent Dimming तंत्रज्ञानासह वापरकर्त्यांना डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर १० देखील मिळणार आहे. डिव्हाइसमध्ये उत्तम ध्वनी गुणवत्तेसाठी जेबीएल स्पीकर्सचा वापर केला गेला आहे. तसेच त्यात क्लिअर व्ह्यू टेक्नॉलॉजी आणि क्लिअर साऊंड टेक्नॉलॉजीही दिली गेली आहे. याशिवाय नोकिया स्मार्ट टीव्हीमध्ये Google व्हॉईस असिस्टंट दिले असून यात Google व्हॉइस असिस्टंटसह नेटफ्लिक्स आणि यूट्यूबसाठी डेडिकेटेड बटणे दिली आहेत. म्हणजे हे फीचर्स वापरण्यासाठी आपल्याला फक्त एका बटनावर क्लिक करावे लागेल.