सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – Tanaji Sawant | सोलापूरचे (Solapur) पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तादत्रय भरणे (Minister Dattatray Bharane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे वाद पेटला आहे. त्यानंतर आता शिवसेनेनेही जशाच तसे उत्तर दिले असून उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही सत्तेत आहात, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही, असा इशारा माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत (Shivsena Leader Tanaji Sawant) यांनी दिला आहे.
पालकमंत्री भरणे यांनी बोलताना, दादा मला खूप काही मिळालं आहे. तुम्हाला काय द्यायचाय तो आशीर्वाद माझ्या अजितदादांना (Ajit Pawar) द्या असे म्हटले. दरम्यान, महापौरांनी निधी संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांचं जाऊ द्या, मरुद्या असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले. यानंतर पुढे सारवासारव करत, आपण मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घेऊ, असेही ते म्हणाले.
भरणे यांच्या या वक्तव्यावरुन जिल्ह्यातील शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांनी पालकमंत्री भरणेंना फैलावर घेतले होते. याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सोलापूरचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख यांनी संताप व्यक्त केला होता. माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी पालकमंत्री भरणेंनी औकातीत रहावे, अशा शब्दांत दम भरला.
उजनी ओलांडू देणार नाही
आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक.
तुम्हाला जनतेनं फेकून दिलं होतं, पण केवळ उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही आज सत्तेत आहात.
तुम्ही तुमच्या औकातीत राहून शब्द वापरा.
सोलापूर जिल्ह्याची बाँड्री, तुम्हाला उजनी धरण (Ujani dam) ओलांडून देणार नाही,
ही शिवसैनिकांची ताकद एका क्षणात तुम्हाला दाखवू शकतो.
फक्त शिवसेनाप्रमुखांच्या आदेश आणि महाविकास आघडीचं (Mahavikas Aghadi) बंधन आम्ही पाळत आहोत, असा इशारा सावंत यांनी व्हिडिओतून दिला आहे.
Web Title :- tanaji sawant | because uddhav thackeray you are power tanaji sawant dattatray bharne
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Ajit Pawar | नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…