बीड : बहुजननामा ऑनलाईन – मातंग समाजास स्वतंत्र आरक्षण द्यावे या मागणीसाठी जलसमाधी घेतलेल्या संजय ताकतोडे या तरुणाच्या कुटुंबीयांची सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे आश्वासनही दिले.
सामाजिक न्यायराज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी ताकतोडे कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी ताकतोडे कुटुंबास मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयासह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दोन लाख रुपये व आ.प्रा.संगिता ठोंबरे यांनी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ताकतोडे कुटुंबातील एका व्यक्तीस शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नौकरी देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मातंग समाजाच्या मागण्या संदर्भात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांचे सोबत आ.संगीता ठोंबरे, रमेश आडसकर, समाजकल्याण सभापती संतोष हंगे, फुलचंद कराड, हारून इनामदार, सुनील गलांडे, दत्तात्रय धस, पंजाब देशमुख, उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव, तहसीलदार सचिन देशपांडे आदी उपस्थित होते.