बहुजननामा ऑनलाइन टीम – OLX वर विक्रीसाठी जाहिरात देणाऱ्या नागरिकांना फसविणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तबल महागडे 16 मोबाईल जप्त करत 6 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
देवराम नारायण चिल्लवार (रा. रांजणगाव, मूळ. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरात लूटमार आणि मोबाईल पळवणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच हैदोस घातला होता. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांना या घटना रोखण्याच्या सूचना केल्या होत्या.
दरम्यान अश्याच प्रकारे स्वारगेट परिसरात घडला होता. त्याची वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी गंभीर दखल घेतली होती. स्वतः लक्ष घालत खबरे कामाला लावले होते. तर कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या होत्या. यावेळी कर्मचारी महेश कांटे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की हा गुन्हा देवराम याने केला आहे.
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक जायभाय, मोरे, कर्मचारी सज्जाद शेख, महेश जगताप व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून 16 महागडे मोबाईल, लॅपटॉप, दुचाकी असा 6 लाख 2 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
देवराम हा उच्चशिक्षित आहे. तो एका मोठ्या कंपणीत नोकरी देखील करतो. त्याच्या चोरीची पद्धत पाहून पोलीस देखील आवक झाले. तो एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा गुन्हे करत होता. OLX वर एखाद्याने मोबाईल विक्रीची जाहिरात दिल्यानंतर तो त्यांना संपर्क करत असे. त्यांना भेटायला बोलवत असे. यानंतर व्यवहार ठरल्यास त्यांना पैसे नाहीत असे सांगत दुचाकीवर एटीएम केंद्रात पैसे काढण्यास म्हणून नेत. मात्र त्याठिकाणी गेल्यावर गाडीवरून पाठीमागे बसलेला व्यक्ती उतरताच तो दुचाकी सुसाट घेऊन पसार होत असे.