डेहराडून : वृत्तसंस्था – उत्तराखंडमधील कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता त्रिवेंद्र सरकारने आठवड्यातून दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. शनिवारी आणि रविवारी राज्यभर लॉकडाऊन असेल. यादरम्यान राज्याच्या सीमा देखील सील असतील. मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
खरं तर, गुरुवारी राज्यभरात कोरोनाचे १९९ नवीन रुग्ण आढळले. कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव उत्पल कुमार सिंह आणि आरोग्य सचिव अमित नेगी यांच्याशी संध्याकाळी उशिरा चर्चा केली आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली होती. हे रोखण्यासाठी शक्य ती पावले उचलली पाहिजे, असे ते म्हणाले.
To curb the spread of #COVID19, it has been decided to impose lockdown on Saturdays and Sundays in the state. Guidelines for the same to be issued soon: Uttarakhand CM Trivendra Singh Rawat (File pic) pic.twitter.com/zoWdVRdSvT
— ANI (@ANI) July 17, 2020
येथे येणाऱ्या लोकांच्या आणि हॉटेल्समध्ये बुकिंग करणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेची काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊनमध्ये केवळ त्या लोकांनाच ये-जा करण्याची परवानगी दिली जावी, जे अत्यंत महत्वाच्या कामासाठी येत आहेत. इथल्या हॉटेल्समध्ये ज्यांनी आधीच बुकिंग केले आहे, त्यांनाही काही अटींसह येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. येथे आरोग्य सचिवांनी सांगितले की, शुक्रवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. लॉकडाऊनचे स्वरूप निश्चित केले जाईल. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आदेश जारी केले जातील.