Nitesh Rane On Supriya Sule | पुणे अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे गप्प का?, त्यांचा अग्रवाल कुटुंबांशी संबंध आहे का?; नितेश राणे (Video)

May 23, 2024

पुणे : – Nitesh Rane On Supriya Sule | पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून (Pune Police) कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जात आहे (Porsche Car Accident Pune) . पुण्यातील अपघातानंतर आता विरोधकांनी सरकारला, पोलिसांना घेरलं आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त (Pune CP Amitesh Kumar), गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सवाल केले जात आहेत. तर कलम 304 लावण्यावरुन काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी देवेंद्र फडणवीसांवर दिशाभूल केल्याचा आरोप केला. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या (Sharad Pawar) खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांचा कायम राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का? असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा चांगलाच समाचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का आहेत? शरद पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे गप्प का आहेत? अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध आहेत का? आरोपीचे वकील शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या मुलावर कडक कारवाई सुरु आहे. आता सुप्रियाताईंनी त्या गप्प का आहेत ते आम्हाला सांगावे. त्यानंतर खूप रहस्य बाहेर येतील.

कीर्तिकर यांनी पक्षाचा राज धर्म पाळला पाहिजे

गजानन कीर्तिकर यांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत नाराजी आहे. कीर्तिकरांवर पक्षांतर्गत कारवाईची शक्यता आहे. या विषयी नितेश राणे म्हणाले, शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेचा हा अंतर्गत विषय आहे. कीर्तिकर साहेबांनी पक्षाचा राज धर्म पाळला पाहिजे. जर पितृ प्रेम असेल तर मुलाने गद्दारी केली नसती.

हे हिरवे वळवळणारे साप आता आले

महाराष्ट्रात जाणीवपूर्वक मतदान कमी व्हावं म्हणून प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला, या विषयी बोलताना नितेश राणे म्हणाले, निवडणूक आयोग आपल्या भारतात लोकशाही टिकवण्याचे काम करत आहे. हे हिरवे वळवळणारे साप आता आले आहेत. हरणार हे माहीत आहे. म्हणून बळीचा बकरा निवडणूक आयोगाला केले जात आहे, असे नितेश राणे म्हणाले.

ACB Trap On PSI | न्यायलायत रिपोर्ट सादर करण्यासाठी मागितली 1 लाखांची लाच, PSI सह एकाला अँटी करप्शनकडून अटक