अमरावती बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक पक्ष एकमेंकावर आरोप -प्रत्यारोप करताना दिसतात त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस -राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्याविरोधात जोरदार प्रचार सुरु केला आहे . त्यामुळे देवपारे यांनी पत्रकार परिषद घेत रवी राणा चांगलाच समाचार घेतला आहे ”माझा अपप्रचार थांबवा, नाहीतर कपडेच उतरवतो’ अशी धमकी त्यांनी एका पत्रकार परिषदेत रवी राणा यांना दिली.
वंचित बहुजन आघाडी कडून अमरावती लोकसभेसाठी गुणवंत देवपारे हे निवडणूक लढवत आहेत. देवपारे यांनी रवी राणा यांच्या विरोधात सिटी कोतवालीत आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.