बहुजननामा ऑनलाईन टीम – बिहार मधील मधुबन येथे एक विचित्र अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. येथील एका शेतात १५ किलोचा दगड मिळाल्याने नागरिकांमध्ये दहशद पसरली आहे. नागरिकांच्या मते हा दगड आकाशातून पडला आणि जमिनीत रुतला आहे.
या दगडावरून नागरिकांमध्ये अनेक चर्चा सुरु आहेत . कोणी याला देवाचा चमत्कार तर कोणी याचा संबंध एलियनशी जोडत आहे. जमिनीत रुतलेल्या या दगडाला काढल्यानंतर त्या जागेवर तीन फूट एवढा खड्डा पडला आहे. येथील पोलीस स्टेशनचे प्रमुख अरविंद कुमार यांनी सांगितले की, नागरिकांच्या मते हा दगड आकाशातून पडला आहे. या दगडामध्ये चुंबकीय तत्त्वही दिसून येत आहेत. या दगडाला चुंबक ही चिकटत आहे. म्हणून या दगडाला चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.
या घटने नंतर नागरिकांनी दगड पाहण्यासाठी मोठी गर्दी केली. काही नागरिकांनी तर देवाचाच चमत्कार म्हणून या दगडाची पूजा करण्यास सुरुवात केली. ज्या व्यक्तीने हा दगड जमिनीतून काढला आहे त्याच्या मते दगडाचा वजन १५ किलो पेक्षा जास्त आहे. वैज्ञानिकांच्या मते ही घटना उल्कापिंड पडण्याची घटना होऊ शकते. आकाशात वीज चमकल्याने वीज निर्माण होते आणि यामुळे दगडात एक विशिष्ठ अशी चुंबकीय शक्ती तयार होते. सध्या वातावरणात एवढा मोठा दगड आला कुठून याची तपासणी चालू आहे.