बहुजननामा ऑनलाईन टीम – गडचिरोली जिल्ह्यात एक विचित्र बाळ जन्माला आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक सरकारी दवाखान्यात या बाळाचे जन्म झाले आहे. हे बाळ एलियनसारखे दिसत असल्यामुळे सध्या या बाबत चर्चा सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एक गर्भवती महिला प्रसूतीसाठी जिह्यातील महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तिच्या प्रस्तुतीनंतर डॉक्टरने जन्मलेले बाळ पाहून थक्क झाले.
३ लाख मुलांमध्ये एखादे मूल यापद्धतीने असल्याची शक्यता असते. अशी माहिती डॉक्टरांनी दिली. अशा पद्धतीने जन्म घेतलेल्या या मुलाला ‘हार्लेक्विन डिजीसी’ नावाचा आजार आहे. या आजारात जन्मलेल्या बाळाची त्वचा खूप जाड असते. या आजारामध्ये जन्मलेल्या बाळाची वाचण्याची शक्यता खूप कमी असते अशी माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी या आजाराला ‘हरलिक्विन सिंड्रोम’ म्हटले आहे. या आजाराला डॉक्टरांनी अनुवांशिक सांगितले आहे.
याविषयी बोलताना जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक डॉ. दीपचंद श्याम म्हणाले की, हा अनुवांशिक आजार असून सरासरी तीन लाख मुलांमध्ये हा आजार एकाला होत असतो. सध्या आरोग्य विभागाची एक टीम या मुलावर लक्ष ठेवून आहे. मेडिकल क्षेत्रातील ही फार दुर्मिळ घटना आहे. या आजारात मुलांची वाचण्याची संख्या फक्त १० टक्के असते. त्यामुळे आता हे बाळ किती दिवस जगते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.