नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – संपुर्ण नांदेड जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृध्दी खाते योजनेच्या खात्याला खातेदाराचा मोबाईल क्रमांक जोडणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती मुख्य पोस्ट मास्तर डी. एम. जाधव यांनी सांगितले.
भारत सरकार संचार मंत्री नवी दिल्ली यांनी शंभर दिवसात सुकन्या समृध्दी खाते धारकाच्या खात्याला मोबाईल क्रमांक जोडण्याचे पत्रक डाक विभागाला दिले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व सुकन्या समृध्दी खातेदारानी आपल्या मुलीच्या नावे उघडलेले सुकन्या समृध्दी खाते पुस्तक जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन मोबाईल क्रमांक जोडून घ्यावा. सुकन्या समृध्दी खात्याला मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे आपल्या खात्यामध्ये रक्कम किती जमा झाली, खात्याला वार्षिक व्याज आकारणी व ऐकून रकमेची शिल्लक आपल्याला मोबाईल मार्फत कळू शकते. सुकन्या समृद्धी खातेदारांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आव्हान मा. डाक अधीक्षक शिवशंकर बी. लिंगायत यांच्यातर्फे करण्यात आले.