बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची बहिण श्वेता सिंह कीर्ती भावासंबंधी अनेक जुन्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहे. तिने सोशल मीडियावर सुशांतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. श्वेताने सुशांतचा असा एक व्हिडिओ शेअर केला त्यात तो रडताना दिसत आहे. या व्हिडीओचं कॅप्शन आणि साउंड बघून तुम्ही देखील भावुक व्हाल.
सुशांत सिंह राजपूतचा हा व्हिडीओ त्याची बहीण श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत सुशांत एका शो मध्ये असल्याचं दिसत असून तो भावुक झालेला दिसत आहे. या व्होडिओ कडे पाहून लक्षात येत नाही की हा व्हिडीओ नेमका कुठला आहे. या व्हिडीओ मध्ये सुशांतच्या ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातील डायलॉग ‘माही पक्का ना बहुत टाइम है ना हमारे पास’ सुरु आहे.
व्हिडीओ शेअर करत श्वेताने लिहिलं की, ‘मी माझा भाऊ गमावलाय, माझं मन रोज आत कुढत असतं.. सत्य समोर यायला अजून किती दिवस लागणार?’ हा व्हिडीओ आत्तापर्यंत 3 लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
याआधी सुशांतच्या बहिनेने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या दोन्ही हाताने लिहीताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत श्वेताने लिहिलं, ‘दुर्लभ प्रतिभा…ideambidexterity- दर्पण लेखन, जगातील फक्त 1% लोकांपेक्षा कमी लोक असं करू शकतात.’ सुशांतमध्ये जे गुण होते त्याला ambidexterity म्हटलं जातं, जे खूप कमी लोकांमध्ये असतात.