नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SSC Constable Job | उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात कर्मचारी निवड आयोगाने (SSC) च्या माध्यमातून भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये जीडी कॉन्स्टेबलच्या (Constable (GD) ) साधारण 25 हजार पदासाठी बंपर भरती होणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार पात्रतेनुसार जीडी कॉन्स्टेबलच्या विविध पदासाठी अर्ज करू शकता. याबाबत ssc.nic.in या संकेतस्थळावर सूचना जारी करण्यात आली आहे. तसेच, यामध्ये पुरुष आणि महिला दोन्ही या पदांसाठी अर्ज (Job Application) करू शकणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पद :
कॉन्स्टेबल जीडी (Constable GD)
एकूण पदे :
25 हजार 271
वेतन :
21, 700 ते 69 हजार 100 प्रतिमहिना (अतिरिक्त भत्तेदेखील)
विविध पदे :
बीएसएफ (BSF) – 6 हजार 413 ( पुरुष), 1 हजार 132 (महिला)
सीआयएसएफ कॉन्स्टेबल व्हेकन्सी (CISF Constable Vacancy) – 7 हजार 610 (पुरुष), 845 (महिला)
एसएसबी कॉन्स्टेबल (SSB Constable) – 3 हजार 806 (पुरुष)
आयटीबीपी कॉन्स्टेबल (ITBP Constable) – 1 हजार 216 (पुरुष), 215 (महिला)
असम राइफल्स (Assam Rifles) – 3 हजार 185 (पुरुष), 600 (महिला)
एसएसएफ कॉन्स्टेबल (SSF Constable) – 194 (पुरुष), 46 (महिला)
शैक्षणिक पात्रता :
10 वी पास उमेदवार
वयाची अट :
18 ते 23 वर्ष
अर्ज कसा करावा ?
GD Constable च्या विविध भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येईल. 17 जुलै 2021 पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून 31 ऑगस्ट 2021 पर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात. जनरल आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना 100 रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे.
कशी असणार निवड प्रक्रिया ?
– उमेदवारांची निवड ही प्रथम लेखी परीक्षेच्या स्वरुपात होईल.
– ही परिक्षा संगणक आधारित चाचणी असणार आहे
– त्यानंतर फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे.
Web Title :- ssc constable job ssc gd constable recruitment 2021 for 10th pass job vacancy in bsf cisf
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | चोरी करताना हटकल्याने चोरट्यांकडून मेट्रोच्या कामगारांना मारहाण, हॅरिस ब्रिजवळील घटना
Pune Crime | ‘खंडणी नाही दिली तर त्याच मातीत गाडून टाकेल’ म्हणणार्या सामाजिक कार्यकर्त्याला अटक