पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | गुन्हेगारांना कोणाचे भय नाही अशीच म्हणण्याची वेळ आली असून, मेट्रोचे (Metro) काम करण्यासाठी आणलेले लोखंडी पाईप चोरणाऱ्या दोघांना कामगारांनी हटकल्यानंतर तिघांनी त्यांना बेदम मारहाण करीत चोरी केल्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी मुन्ना रामसेवक कुमार सहा (वय 41) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार तीन अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, खडकीत बोपोडी चौक (khadki-bopodi chowk pune) येथील हॅरिस
पुलाजवळ (Harris Bridge, Khadki) मेट्रोचे कामकाज (Metro) सुरू आहे. कामकाज
करण्यासाठी येथे लोखंडी पाईप आणि इतर साहित्य आणून ठेवले आहे. फिर्यादी हे याठिकाणी काम करतात. दरम्यान दोन दिवसांपूर्वी कामकरून ते घरी निघाले होते.
Pune Crime | ‘खंडणी नाही दिली तर त्याच मातीत गाडून टाकेल’ म्हणणार्या सामाजिक कार्यकर्त्याला अटक
पण, पाऊस आल्याने येथील पिलरच्या आडोशाला फिर्यादी थांबले होते. त्याचवेळी एकजण लोखंडी पाईप घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यांनी त्याला हटकले. मात्र तो ब्रिजवर गेला व तेथून ते पाईप टाकून दिले. फिर्यादी हे पाईप पाहत असताना आरोपीचा एक साथीदार त्यांच्याजवळ आला. फिर्यादीनी त्याला हटकले असता त्याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर पाईप चोरणारा आणि आणखी एकजण तेथे आला. या तिघांनी मिळून त्यांनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. पाईपने पायावर मारहाण झाल्याने फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास खडकी पोलीस (Khadki Police) करत आहेत.
Web Title :- pune crime metro workers beaten by thieves for stealing while stealing incident near harris bridge at khadki bapodi
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला