नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेश मध्ये सपा-बसपाची आघाडी झाली असताना. सपा- बसपा कडून काँग्रेसला लोकसभेच्या ११ जागेची नवीन ऑफर देण्यात आली आहे. सपा-बसपानी काँग्रेस ला आघाडी मध्ये सामील करून घेण्यचा प्रस्ताव ठेवला आहे.
काँग्रेस ने सपा-बसपाच्या आघाडी मध्ये सामील होण्यासाठी लोकसभेच्या २० जागेची मागणी केली होती. परंतु आता ते १७ जागा मागत आहेत.पण सूत्रानुसार काँग्रेस १५ जगावर समाधान मानेल असे सांगण्यात येते. या पूर्वीच सपा-बसपाने रायबरेली व अमेठी ह्या जागा काँग्रेस साठी सोडल्या आहेत. सपा-बसपाची आघाडी नंतर काही दिवसाच काँग्रेस ने प्रियंका गांधी वाड्रा याना पूर्व उत्तर प्रदेशची जीमेदारी देताना त्यांना पक्षाच्या महासचिव पदी नेमण्यात आले आहे. प्रियांका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यामुळे सपाआणि बसपाने थोडी नरमाईची भूमिका घेत काँग्रेस ला हि नवीन ऑफर दिली आहे. या अगोदर सपा-बसपानी ३८- ३८ जागेचा फार्मुला अवलंबिला होता. पण नंतर सपा-बसपाच्या आघाडी मध्ये राष्ट्रीय जनता दल (आरएलडी) सामील झाल्यामुळे त्यांना मथुरा, मुजफ्फरनगर,आणि बागपत या जागा देण्यात आला.