किनवट : ( माधव मेकेेवाड) बहुजननामा ऑनलाईन – महेंद्रा रुरल हौसिंग फायनान्स तर्फे महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या अठरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी आठ हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. आदिवासी अतिदुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या हुशार ,होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना धनादेशाद्वारे आठ हजार रुपये वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव अभियंता प्रशांत ठमके होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून टेरिटरी मॅनेजर रामलिंग रोडगे, अरविंद पवार, ज्ञानेश्वर देवकते ( एच.आर. ), अशोक ओंकार पडलवार (बी. एम. ), श्रीकांत पाटील,प्राचार्य राजाराम वाघमारे, उपमुख्याध्यापक जे.एस. पठाण,उपप्राचार्य एस. के. राऊत यांच्यासह पत्रकार साजिद बडगुजर, मधुकर अन्नेवार यांची उपस्थिती होती.
शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये धनादेश आणि प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.रामलिंग रोडगे यांनी यावेळी आपल्या मनोगतात असे सांगितले की, आपण दुसऱ्याकडे न पाहता आपल्याकडे जगाने पाहिले पाहिजे. याप्रसंगी बोलताना प्राचार्य वाघमारे म्हणाले की, शिष्यवृत्तीचा शैक्षणिक कार्यासाठी उपयोग करावा. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व सामाजिक उपक्रमासाठी संस्था, शाळा सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन केले. पर्यवेक्षक शेख हैदर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संतोष बैसठाकूर, प्रा. रघुनाथ इंगळे,प्रा. संजय ढाले, प्रा. बापू पाटील, पर्यवेक्षक महेंद्र नरवाडे व किशोर डांगे आदींनी परिश्रम घेतले.