बहुजननामा ऑनलाईन – Sourav Ganguly | आजकाल प्रेक्षकांना देखील बायोपिक चित्रपट पाहण्यामध्ये रस आहे. त्यामुळे सध्या अनेक निर्माते आणि दिग्दर्शक बायोपिक चित्रपट बनवण्यासाठी झटत आहेत. किती दिवसांपासून क्रिकेटर सौरभ गांगुलीवर बायोपिक बनवण्याची चर्चा चालू होती. आता अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे. आता महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर यांच्या बायोपिकच्या यशानंतर सौरभ गांगुलीचा (Sourav Ganguly) सुद्धा बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा बायोपिक दादांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कित्येक दिवसांपासून चाहते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीच्या बायोपिकची आतुरतेने वाट पाहत होते. या बायोपिकसाठी हृतिक रोशन ते सिद्धार्थ मल्होत्रा पर्यंतच्या कलाकारांची नावे जोडली जात होती. मात्र आता अखेर अभिनेता रणबीर कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप तरी निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही.
सौरभ गांगुलीच्या बायोपिकसाठी रणबिर कपूरचे नाव फायनल करण्यात आले आहे. या चित्रपटाचे शूट सुरू व्हायच्या आधी रणबीर कोलकत्ता येथे जाणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी तो ईडन गार्डन,सीएबी ऑफिस आणि दादाच्या घरालाही भेट देणार आहे. त्यानंतरच तो शूटिंगला सुरुवात करणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र अद्याप तरी या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाल्याचे दिसत नाही. (Sourav Ganguly)
सौरभ गांगुलीच्या जीवनावर आधारित या बायोपिक मध्ये धोनीची देखील भूमिका असणार आहे. आता धोनीची झलक सौरभ गांगुलीच्या बायोपिक मध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अद्याप तरी या बायोपिक मध्ये धोनीची भूमिका कोण साकारणार हे अजून काही निश्चित झालेले नाहीये. ‘तू झुठी मैं मक्कर’ या चित्रपटाच्या प्रमोशन नंतर रणबीर या प्रोजेक्टमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सौरव गांगुलीची कारकीर्द
सौरव गांगुलीने आपल्या कारकिर्दीत 18 हजारांहून अधिक धावा केल्या.
त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 38 तके आणि 107 अर्धशतके आहेत.
कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात त्याची फलंदाजीची सरासरी 41+ आहे.
त्यांनी आपल्या कारकिर्दीत गोलंदाजीच्या जोरावर 132 विकेट्स घेतल्या आहेत.
सौरव गांगुलीची गणना भारतातील यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते.
Web Title :- Sourav Ganguly | sourav ganguly biopic ranbir kapoor confirmed for sourav gangulys biopic likely to visit kolkata soon
हे देखील वाचा :
MLA Rohit Pawar | ‘शरद पवारांच्या नादाला कोणी लागू नये, लागलात तर तुमचं…’, रोहित पवारांचा सूचक इशारा