पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. तर तरुणीच्या ओळखीच्या व्यक्तीने स्वस्तात गाड्या मिळवून देण्याच्या बहाण्याने साडेसात लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Chinchwad Crime) पिंपरी येथे 16 सप्टेंबर 2022 ते 27 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी पीडित तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) बुधवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रुपेश शालीग्राम धुरई Rupesh Shaligram Dhurai (वय-38 रा. कमल क्रिस्ट अपार्टमेंट, हुडकेश्वर रोड, कलावती नगर, नागपूर-Nagpur) याच्यावर आयपीसी 376 (2) (एन), 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची शादी डॉट कॉम (Shaadi.com) या साईटवर
ओळख झाली. आरोपीने इंडियन ऑइल अँड नॅचरल गॅस रिसोर्सेस (Indian Oil and Natural Gas Resources)
मध्ये नोकरी करत असल्याचे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन त्यांना लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून
वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यानंतर लग्नास नकार देऊन फिर्यादी यांची फसवणूक (Cheating) केली.
तसेच फिर्य़ादी याच्या परिचयाचे अभिजीत मदने (Abhijeet Madane) यांनी कमी किमतीत गाड्या
मिळवून देण्याच्या बहाण्याने 7 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime | First he cheated by showing the lure of marriage, then an acquaintance cheated him of 7.5 lakhs; Incidents in Pimpri area
हे देखील वाचा :
MLA Rohit Pawar | ‘शरद पवारांच्या नादाला कोणी लागू नये, लागलात तर तुमचं…’, रोहित पवारांचा सूचक इशारा
Pune Crime News | बापानेच केला अडीच वर्षाच्या मुलीचा विनयभंग; जाब विचारणार्या पत्नीला केली मारहाण