पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – शिंदे गटाचे नेते (Shinde Group) भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पत्रकारांशी बोलताना आम्ही शरद पवारांचा (NCP Chief Sharad Pawar) नाद सोडला आणि दुसऱ्या नादाला लागलो असल्याची खोचक टीका केली होती. गोगावले यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी प्रत्युत्तर देताना सुचक इशारा दिला आहे. राजकीयदृष्ट्या शरद पवारांच्या नादाला कोणी लागू नये, जर तुम्ही त्यांच्या नादी लागलात, तर तुमचं उद्या काय होईल, हे सांगता येणार नाही, असं रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी म्हटलं. ते पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध राजकीय मुद्यांवरही भाष्य केलं.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रोहित पवार (MLA Rohit Pawar) पुढे म्हणाले, शिवसेना (Shivsena) पक्ष फुटला, पक्षाचे चिन्ह आणि पक्ष आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हातामध्ये राहिलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी जनता आहे. त्यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात नागरिकांना धीर देण्याचे काम केले. अनेक कामे त्यांनी केली असल्याचे पवार म्हणाले.
नुकताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांचा पुणे दौरा झाला. या दौऱ्याबाबत बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अमित शाह आले. मात्र अनेक सर्वे भाजपच्या विरोधात असल्याने त्यांनी याठिकाणी सभा घेतली नाही. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली असून चिंचवड पोटनिवडणुकीत (Pune Chinchwad Bypoll Election) राष्ट्रवादीचे उमेदवार 50 हजार मतांनी विजयी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे उपोषण (MPSC Student Hunger Strike) सुरु आहे.
यावर बोलताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडलं.
ते म्हणाले, एमपीएसचीचे विद्यार्थी आंदोलन करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रचारात मग्न आहेत.
आज तरुणांसोबत शरद पवार यांनी वेळ दिलेला असताना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ही बैठक झाली नसावी, असे ते म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- MLA Rohit Pawar | ncp mla rohit pawar reaction on bharat gogavale statement on sharad pawar
हे देखील वाचा :
Pune Crime News | बापानेच केला अडीच वर्षाच्या मुलीचा विनयभंग; जाब विचारणार्या पत्नीला केली मारहाण