सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – मोजमाप पुस्तिकेवर सही करण्यासाठी 13 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) सोलापूर मनपातील (Solapur Municipality) सहायक अभियंत्याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Solapur ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुनील नेमिनाथ लामकाने Sunil Neminath Lamakane (वय 57) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे (Assistant Engineer) नाव आहे. सोलापूर एसीबीने (Solapur ACB Trap) ही कारवाई लामनकाने यांच्या कार्यालयात केली.
याबाबत 40 वर्षाच्या व्यक्तीने सोलापूर एसीबीकडे (Solapur ACB Trap) तक्रार केली आहे. लामकाने हे महापालिकेत गलिच्छवस्ती सुधारणा तांत्रिक विभागात सहायक अभियंता आहेत. ठेकेदाराने (Contractor) मनपा हद्दीमधील शेळगी ते स्मशानभूमी व तुळजापूर वेस येथील बारामती बँक ते आकाशगंगा मंदिरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. या कामाच्या मोजमाप पुस्तकावर सही करण्यासाठी लामकाने याने 13 हजार रुपये लाच मागितली. याप्रकरणी ठेकेदाराने तक्रार केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करुन सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना लामकाने यांना त्यांच्याच कार्यालयात पकडण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक (Police Inspector Umakant Mahadik),
पोलीस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, सलीम मुल्ला, चालक शाम सुरवसे यांच्या पथकाने केली.
Web Title :- Solapur ACB Trap | Engineer of Solapur municipality caught in anti-corruption net while taking bribe
हे देखील वाचा :
Navi Mumbai Crime News | उरणमध्ये पाच वर्षांच्या मुलीवर 14 वर्षीय मुलाकडून अत्याचार
Pune Crime News | बोपदेव घाटात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांकडून अटक