बहुजननामा ऑनलाईन टीम : Ravindra Jadeja | सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात उस्मान ख्वाजाची विकेट घेत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जडेजाने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय आहे तो विक्रम
जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत आपल्या 250 विकेट पूर्ण केल्या आहेत. या कामगिरीमुळे तो 250 किंवा त्याहून अधिक विकेट घेणाऱ्या अनुभवी गोलंदाजांच्या यादीत तो आठवा गोलंदाज ठरला आहे. या यादीमध्ये अनिल कुंबळे हे या यादीत सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज आहेत. त्यांच्या नावावर 619 विकेट्स आहेत. आर अश्विन 457, कपिल देव 434, हरभजन सिंग 417, इशांत शर्मा 311, झहीर खान 311, बिशन सिंग बेदी 266 यांचा नंबर लागतो.
https://twitter.com/BCCI/status/1626493241276391425
250 हून अधिक विकेट घेणारे गोलंदाज
अनिल कुंबळे – 619
आर अश्विन – 457
कपिल देव – 434
हरभजन सिंग – 417
इशांत शर्मा – 311
झहीर खान – 311
बिशन सिंग बेदी – 266
रविंद्र जडेजा – 250
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा खेळाडू
यासह जडेजा (Ravindra Jadeja) कसोटीत 250 बळी आणि 2500 धावा पूर्ण करणारा जगातील दुसरा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या अशी कामगिरी फक्त इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथमने केली होती. त्याने 55 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. तर जडेजाला हि कामगिरी करण्यासाठी 61 कसोटी सामने खेळावे लागले.
Web Title :- Ravindra Jadeja | ravindra jadeja becomes the fastest indian and second fastest in world cricket to 250 test wickets and 2500 test runs ind vs aus 2nd test
हे देखील वाचा :
Solapur ACB Trap | लाच घेताना सोलापूर मनपाचा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | बोपदेव घाटात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तिघांना कोंढवा पोलिसांकडून अटक