नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Social Media | न्यूयॉर्कच्या एका महिलेने आपल्या सासूसाठी एक अशी जाहिरात दिली आहे, जी सोशल मीडिया (Social Media) साईट रेडिटवर वायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये महिलेने डिमांड केली आहे की तिला तिच्या सासू(Mother-in-law)साठी बॉयफ्रेंड(Boyfriend) पाहिजे. दोन दिवसासाठी सासूसोबत राहण्यार्या या व्यक्तीला 72 हजार रुपये दिले जातील.
न्यूयॉर्कच्या हडसन व्हॅलीतील एका महिलेने क्रेगलिस्टवर दिलेल्या जाहिरातीत लिहिले आहे की, तिला आपल्या 51 वर्षीय सासूसाठी एक जोडीदाराची आवश्यकता आहे, जो तिच्यासोबत विवाह आणि डिनरमध्ये सहभागी होऊ शकतो. दोन दिवसापर्यंत त्याला सासूसोबत राहावे लागेल, ज्यासाठी ती त्याला एक हजार डॉलर म्हणजे 72 हजार रुपये देईल.
Social Media | woman offer be mother in law boyfriend for 2 days take 72 thousand
कारण, या महिलेला एका विवाह सोहळ्या(Wedding ceremony)त सहभागी व्हायचे आहे, आणि तिला आपल्या सासूला सुद्धा सोबत न्यायचे आहे. तिला वाटते की, या विवाहाच्या पार्टीत सासूसुद्धा सुंदर कपड्यांमध्ये एका कपलप्रमाणे दिसावी.
जाहिरातीत लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये हडसन व्हॅलीत एका विवाहासाठी शुक्रवारी सायंकाळपासून
शनिवार सायंकाळपर्यंत माझ्या सासूसाठी बॉयफ्रेंडचा शोध घेत आहे. त्याला दोन दिवस सासूसोबत राहावे लागेल आणि तिची काळजी घ्यावी लागेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या जाहिरातीमध्ये लिहिले आहे की, सासू सफेद रंगाचे कपडे घालेल. भाड्याने घेतलेल्या व्यक्तीला तिच्यासोबत एका जोडप्यासारखे नाटक करावे लागेल. दोन दिवसासाठी असे केल्याने कुणीही एक हजार डॉलर कमावू शकतो.
जाहिराती(Advertising)त म्हटले आहे की, या सोहळ्यासाठी तिला अशा व्यक्तीची आवश्यकता आहे ज्याचे वय 40 ते 60
वर्षाच्या दरम्यान असेल. तो चांगला डान्सर असेल आणि चांगले बोलत असेल.
रेडिटवर ही जाहिरात शेयर झाल्यानंतर यूजर्सने कमेंटचा भडीमार केला आहे. काहींनी लिहिले आहे की, हे
मस्तच आहे, तर एका यूजरने तर एका व्यक्तीसाठी शिफारस सुद्धा केली आहे.
एका महिलेने म्हटले आहे की, जेव्हा मी हे वाचले, तेव्हा मी ताबडतोब माझ्या पतीबद्दल विचार केला. आणखी
एकाने लिहिले आहे की, हे अवघड आहे, परंतु कधी-कधी हे ठिक आहे. हा एक अतिशय योग्य सौदा आहे,
भोजन आणि प्रवासाचे पैसे वेगळे मिळत आहेत, यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते.
web title: Social Media | Woman’s offer! Be mother-in-law’s boyfriend for 2 days, take 72 thousand
Pune Crime | पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील कुख्यात बंटी पवार टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई