डोंबिवली न्यूज : बहुजननामा ऑनलाईन – Dombivli Crime | डोंबिवली येथील एका सोसायटीमधील शेजाऱ्यांत किरकोळ कारणावरुन वाद निर्माण (Dombivli Crime) झाला. हाच वाद उफाळून तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला आहे. या घटनेवरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधित चौघांना पोलिसांनी अटक (Arrest) देखील केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबिवली पूर्वेतील देसले पाडा परिसरातील साई इन्कल्यू (Sai Enclave) या सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने इमारतीच्या एका मजल्यावर घाण केली.
तर दुसऱ्या एका महिलेने या कारणावरून त्या महिलेशी वाद घातला.
ज्या महिलेचा कुत्रा होता तिने साफसफाई केली मात्र, नंतर हा वाद वाढला.
त्यानंतर याच कारणावरून सोसायटीमधील शेजारी आपापसात भिडले.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यांनतर महिलांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती त्यात काही पुरुष देखील सामील झाले.
दरम्यान, या हाणामारीचा एक व्हिडीओ (Video) उघडकीस आला आहे.
या हाणामारीचा व्हिडीओ समाज माध्यमावर जोरदार प्रसारित होत आहे.
दरम्यान, मानपाडा पोलिसांनी (Manpada Police) दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणावरून एकूण 4 आरोपींना अटक करण्यात आली असून, याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title : Dombivli Crime | dombivli free style fight among society members in desale pada video goes viral
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Today petrol price | एक दिवसाआड पेट्रोलच्या दरात वाढ !
Mumbai |DRI कडून लक्झरी कार ‘तस्करी’च्या रॅकेटचा केला ‘पर्दाफाश’
Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये