बहुजननामा ऑनलाइन टीम – एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमधूनही अनेकदा समोर येताना दिसत असतात. आज आपण बॉलिवूड स्टार अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा किस्सा जाणून घेणार आहोत. माधुरीनं का अनिल कपूरसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला यांच कारण काय होतं याची माहितीही आपण घेणार आहोत.
https://www.instagram.com/p/CAk-j3KB6DB/
अनिल आणि माधुरी हे एकत्र काम करत असताना त्यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चा रंगताना दिसल्या होत्या. मीडियात रोज दोघांबद्दल बातम्या येत होत्या. दोघांमध्ये मैत्रीपलीकडे काही असल्याची माहिती समोर आली होती.
https://www.instagram.com/p/CAk6zB2hwB3/
त्यावेळी अनिल विवाहीत होता. माधुरी आणि त्याच्या प्रेमसंबंधांची बातमी पत्नी सुनिता कपूरच्याही कानावर गेली. एका दिवस सुनीता सत्य जाणून घेण्यासाठी मुलांसह सिनेमाच्या सेटवर पोहोचली. यावेळी माधुरीनं त्याला कुटुंबासोबत वेळ घालवताना पाहिलं. त्यांच्या या हॅप्पी फॅमिलीत आपली जवळीक नको असं तिला वाटू लागलं.
https://www.instagram.com/p/CAOB9tnBCoe/
त्यांच्या वैवाहिक जीवनात आपल्यामुळं काही वादळ निर्माण होऊ नये यासाठी खुद्द माधुरीनंच अनिलमध्ये जास्त गुंतण्याआधी दूर जाण्याचा निर्णय घेतला. अनिलसोबत सिनेमात काम न करण्याचा निर्धारही तिनं केला. यानंतर सिनेमासाठी ज्या ऑफर्स माधुरीला यायच्या त्यात अनिल कपूर हिरो नाहीये ना याची शहानिशा करूनच ती या ऑफर्स स्विकारू लागली.
https://www.instagram.com/p/B-gf2A_hA6y/
डायरेक्टर राजकुमार संतोषी यांच्या पुकार सिनेमात दोघांनी अखेरचं एकत्र काम केलं. हा सिनेमा 2000 साली रिलीज झाला होता. यानंतर तब्बल 17 वर्षांनंतर त्यांनी टोटल धमाल या सिनेमात एकत्र काम केलं.
https://www.instagram.com/p/B89UMg7hDWT/
https://www.instagram.com/p/B8mTPM1hGXI/
https://www.instagram.com/p/B8bkjOiB3G9/
https://www.instagram.com/p/B78wCT2hJDm/
https://www.instagram.com/p/B7i_-BYhIDC/
https://www.instagram.com/p/B65BAiYhs1O/
https://www.instagram.com/p/B6dY700hJE6/
https://www.instagram.com/p/B6S8siphprJ/
https://www.instagram.com/p/B6S8oh4hJen/
https://www.instagram.com/p/B6S8jqwBNIY/