सिरसा : वृत्तसंस्था- पोलिसांनी ब्लॅकमेलिंग करणार्या टोळीचा पर्दाफाश करत 3 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिला आणि एक पुरूष आहे. त्यांचा एक साथीदार अजूनही फरार आहे. सध्या पोलिसांनी पीडित युवकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींकडून 28 हजार रुपये रोख, एक स्कूटी आणि एक मोबाइल जप्त करण्यात आला असून तपास सुरू आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यवान यांनी सांगितले की, कल्याण नगरमध्ये राहणारा युवक नवदीपने तक्रार केली होती की, काही लोक त्याला ब्लॅकमेल करत आहेत. पीडीत युवकाने सांगितले की, एक महिलेने त्याला फ्रिज दुरूस्त करण्यासाठी घरी बोलावले. जेव्हा तो तेथे पोहचला तेव्हा महिलेने खोलीचा दरवाजा बंद केला आणि ठरल्याप्रमाणे महिलेचे दोन साथीदार तेथे पोहचले आणि त्याचे कपडे काढून त्याचा व्हिडिओ तयार केला.
गुन्ह्याचा तपास सुरू आहे
त्यांनी युवकाकडे 50 हजार रूपयांची मागणी केली. पीडित युवकाला धमकी देण्यात आली की, पैसे न दिल्यास पोलिसांत त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करू, त्यानंतर पीडित युवकाने तीन वेळा एकुण 28000 रुपये आरोपींना दिले. आणि त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.
एक आरोपी फरार
पोलिसांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर कारवाई करून 2 महिलांसह तीन लोकांना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 28000 रुपये, पीडित तरूणाची स्कुटी आणि मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
Visit : bahujannama.com