नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सुमारे 40 दिवसांपासून नागरिकत्व दुरूस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरविरोधात महिला आंदोलन करत आहेत. यावर केंद्र सरकार शांत आहे. परंतु, विरोधी पक्ष राजकारण करत आहेत. नुकतेच मुळ पाकिस्तानी असलेले कॅनेडियन लेखक व प्रसिद्ध विचारवंत तारिक फतेह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यावर जावेद अख्तर यांनी उत्तर दिले आहे.
Could someone confirm if this video is from the #CAA_NRCProtests at #ShaheenBagh or nor? pic.twitter.com/WKeL4RlUnO #DeepakChaurasia
— Tarek Fatah (@TarekFatah) January 25, 2020
शनिवारी तारिक फतेह यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेयर केला होता. या व्हिडिओत अनेक लोक बुरखा घालून स्टेजवर नाचताना दिसत आहेत. ते महिला आहेत की पुरूष हे ओळखणे अवघड आहे. त्यांच्यामध्ये एक नटलेली महिलाही बसली आहे. हा व्हिडिओ शेयर करून तरीक फतेह यांनी विचारले आहे की, हा व्हिडिओ शाहीन बागचा आहे अथवा नाही. तारिक फतेह यांच्या या व्हिडिओच्या खाली प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कमेंट केले की, हे ओळखण्यासाठी कोणत्या शेरलॉक होम्सची गरज नाही. हे रेकॉर्डिंग कोणत्यातरी मूर्ख लोकांच्या लग्न सोहळ्यातील आहे.
one doesn’t have to be Sherlock Holmes to see, this recording is of some stupid wedding celebration.The bride is sitting . It is atleast 18 months old I remember it had gone viral Sir you may disagree with the women protesters of SB but to trivialise them is not in good taste
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) January 26, 2020
हा सुमारे 18 महिने जुना व्हिडिओ आहे. तुम्ही महिला आंदोलनकर्त्यांशी असहमत असू शकता पण त्यांचा तुम्ही अपमान करू शकत नाही. काही दिवसांपूर्वीच तारिक फतेह यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते की, नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला विरोध करणारे फुटीरतावादी मानसिकतेने ग्रासलेले आहेत. यास विरोध करणार्या महिलांनी प्रथम बुरख्यापासून स्वातंत्र्य मागायला हवे होते. जावेद अख्तर यांची पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी एका अपघातात जखमी झाली होती. हा अपघात जावेद अख्तर यांच्या वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी झाला होता.
Visit : bahujannama.com