बहुजननामा ऑनलाईन टीम – बलात्काराच्या अनेक घटना रोज आपल्या कानावर येत असतात. त्यातच हैदराबादमधून एक नवीनच प्रकरण समोर आलं आहे. तेलंगणात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हे ऐकून अनेकांचे होश उडतील. कारण ही घटना काहीशी अशीच आहे. एका माणसाने आपल्या सासूवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.
तसेच या प्रकरणाबद्दल जर कोणाला सांगितले. तर तुमच्या मुलीला घटस्फोट देईन अशी धमकी या पीडित महिलेला दिली. आपल्या सासूवर बलात्कर करून तिला धमकी दिल्याचा प्रकार हैदराबादमधील बाळापूरमध्ये समोर आला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, हैदराबामधील बाळापूर मधील एका माणसाने आपल्या सासूवर बलात्कार केला. व या महिलेने जर या प्रकरणाबद्दल कोणाला काही सांगितले. तर तुमच्या मुलीला मी नांदवणार नाही. तिला लगेच घटस्फोट देईल अशी धमकी त्याने आपल्या सासूला म्हणजेच पीडितेला दिली होती. पण तिने त्या धमकीला न जुमानता पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार केली. यामुळे आरोपीवर आपल्या सासूवर बलात्कार केल्यामुळे ३७६ आणि ५०६ या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.