बहुजननामा ऑनलाईन टीम – अनेकांचे वाईट दिवस चांगले होतात आणि अनेकांचे चांगल्या दिवसाचे वाईट दिवस होतात. त्यामुळे कोणाचे नशीब कधी चमकेल ते सांगता येत नाही. असेच एका महिलेसोबत घडले. ही महिलेने जवळपास १३ वर्षांपूर्वी रस्त्यावरील गाड्यावरुन खरेदी केलेली सामान्य स्फटिकासारखी अंगठी हातात घालत होती. रस्त्यावरील गाड्यावरुन घेतलेली ही अंगठी आपले आयुष्य बदलेल याची कल्पना त्या बाईने कधीच केली नसेल. गाड्यावर खरेदी केलेल्या या अंगठीमुळे ही महिला कशी लक्षाधीश झाली ते आपण जाणून घेऊया.
लंडनमधील एका महिलेने १३ वर्षपूर्वी रस्त्यावरील गाड्यावरुन अंगठी विकत घेतली. ती अंगठी ही महिला गेल्या १३ वर्षांपासून घालत आहे. या अंगठीमुळे आपले नशीब बदलेल असा विचार या महिलेने कधीच केला नव्हता. पण काहीसे तसेच घडले आहे. अंगठी खरेदी केल्यानंतर १३ वर्षांनी ही महिला करोडपती बनली आहे.
त्यावेळी या महिलेने ही अंगठी केवळ १३ डॉलर्समध्ये विकत घेतली होती. परंतु या अंगठीमध्ये एक महाग असा डायमंड होता आणि या अंगठीची किंमत जेव्हा महिलेला समजली तेव्हा ती स्तब्ध झाली होती.
१३ डॉलरमध्ये खरेदी केलेल्या हा अंगठीची किंमत ४६ हजार डाॅलर होती. महिलेच्या अंगठीवरील हिरा २६ ते २७ कॅरेट होता. भारतीय चलनात किंमत २९ लाख आहे. या महिलेने हा हिरा क्रिस्टल स्टोन म्हणून विकत घेतला आणि आता या महिलेचे तर नशीबच उघडले आहे.
ही महिला तिची अंगठी दुरुस्त करायला सोनाराकडे गेली होती. तेव्हा त्या सोनाराने तिला ही अंगठी महागडी असल्याचे सांगितले. आर्थिक अडचणीमुळे या महिलेने ही अंगठी विकली त्यामुळे ही महिला करोडपती झाली आहे.
- ‘या’ ७ वनौषधी करतील मेंदूला ‘तल्लख’, जाणून घ्या कसे करायचे उपाय
- स्वतःच्या हाताने का होत नाही गुदगूल्या ? मेंदूशी संबंधित १० आश्चर्यकारक गोष्टी
- पोटाच्या ३ मिनिटांच्या ‘या’ मालिशने होतात ‘हे’ ८ चमत्कारी फायदे
- सावधान ! ‘या’ रोगांमुळे होऊ शकतो २४ तासांत मृत्यू, जाणून घ्या लक्षणे
- पहिल्या वेळेस सेक्स करत असाल तर घ्या ‘ही’ काळजी
- ताक प्यायल्याने होतात ‘हे’ ११ चमत्कारी फायदे, जाणून घ्या
- पाय करा, दूर होतील विविध आजार, जाणून घ्या