मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Shivsena MP Sanjay Raut | भाजपचे नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री होतील, अशी राज्यभर चर्चा होती. मात्र, ऐनवेळी एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाची घोषणा झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला गेला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत Shivsena (MP Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
“पडद्यामागची इनसाइड स्टोरी फडणवीस यांच्याकडे नेहमी माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं होतं. त्यांना उपमुख्यमंत्री म्हणायला मला खूप जड जात आहे,” असं संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. त्यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत बसलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री व्हा असा आदेश दिला जातो आणि ज्युनिअर मंत्री असलेल्या दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्री केल्यास कोणाला आनंद होईल?,” असा प्रश्न देखील राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले, “फडणवीसांनी पक्षाचा आदेश मानला. याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं, त्यानंतर राऊत यांनी भाजपवर टीकाही केली.
भाजपला (BJP) मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईतील शिवसेनेची ताकद नष्ट करायचीय.
त्यासाठी एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदुक ठेवली आहे. मुंबईत शिवसनेनेचाच पराभव करण्यासाठी त्यांना एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केलं.
जनतेला भ्रमिष्ट करणं ही भाजपची रणनीती आहे आणि शिंदेही आता याच मार्गाने जात आहेत,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | Shivsena leader and mp sanjay raut reaction to bjp decision to give devendra fadnavis the post of deputy chief minister
हे देखील वाचा :
Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2 तरुणावर काळाचा घाला