बहुजननामा ऑनलाईन – पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि लुप्त होत चाललेल्या दुर्मिळ वनस्पती याबद्दल प्रत्येकजण फक्त चिंता व्यक्त करत असतो, मात्र कोणीही त्याबद्दल स्वतःहून पावले उचलताना दिसत नाही. मात्र कर्नाटकमधील पर्यावरणतज्ज्ञ बी. वेंकटगिरी यांनी तब्बल पाचशे वनौषधींच्या वनस्पतींची लागवड आणि त्यांचे जनत करुन पर्यावरणाबद्दलच्या त्यांच्या समर्पणाचे उदाहरण दिले आहे. ही झाडे त्यांनी त्यांच्या घराच्या परसदारात लावून त्यांनी अप्रतिम अशी बाग तयार केली आहे. पर्यावरणाची फ्कतपर्यावरणतज्ज्ञ चिंता व्यक्त न करता या कार्यातून पर्यावरणाबद्दल आपला खारीचा वाटा उचलला आहे.
Shivamogga: Environmentalist preserves 500 varieties of herbal plants by creating unique garden at house
Read @ANI story | https://t.co/vj8gkmiy26 pic.twitter.com/4KcD6phfPi
— ANI Digital (@ani_digital) September 15, 2019
वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ७३ वर्षाचे वेकंटगिरी यांनी वनौषधी वनस्पतींचे महत्व कळावे यासाठी त्यांनी संपुर्ण कर्नाटकात प्रवास केला आहे. या प्रवासात त्यांनी १५०० हून अधिक दुर्मिळ प्रजातीची बियाणेही गोळा केली आहेत. त्यांच्या पवित्र ग्रंथात उल्लेख असलेल्या नवग्रहणा, नंदनवन, नक्षत्रवन, पवित्रवाणी, अश्विनीवाणा या वनस्पतींची पारंपरिक पद्धतीने लागवड करुन त्यांना वाढविले आहेत. तसेच, या वनस्पतींना वाढविण्यासाठी त्यांनी स्वतःची एक वेगळीच पद्धत विकसित केली आहे. त्यांना या वनस्पतींचे महत्व पुढीच्या पिढीला हस्तांतरीत करायचे असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. आपल्या बागेतील वनस्पतींची पाहण्यासाठी ते शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आमंत्रित करत असतात.