रत्नागिरी : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेनेत मोठ्या पप्रमाणात मेगाभरती सुरु आहे. परंतु आता भाजपच्या मेगाभरतीत शिवसेनेचाच आमदार गळाला लागणार असल्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वार्तिविली जात आहे. भाजपच्या रत्नागिरी येथील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असताना मंगळवारी रात्री उशीरा सूर्यकांत दळवी यांनी भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे लवकरच सूर्यकांत दळवी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगविली जात आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना सूर्यकांत दळवी यांनी सांगितले की, ‘शिवसेना पक्षाने माझी दखल घेतली नाही. माझ्यावरील हा अन्याय मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. त्यामुळे अश्या परिस्थितीत मला भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागेल. सूर्यकांत दळवी हे दापोलीचे माजी आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास कदम यांच्यावर आरोप करत म्हंटले होते कि, रामदास कदम हे जादूटोणा करणाऱ्या बुवांना सोबत घेऊन फिरतात, ते बुवाबाजी करतात. कदम यांना विरोधी पक्षनेता होण्यासाठी देखील आमच्यासोबत भगत दिला होता. प्रत्येक अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, असा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केला होता.
रामदास कदम आणि सूर्यकांत दळवी हे एकाच पक्षात असले, तरीही त्यांच्यातील वाद काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे दोघांमध्ये कायम खटके उडत असतात. याच भांडणामुळे दळवी यांनी कदम यांना दापोली येथून उमेदवारी देण्यास विरोध दर्शविला होता. दळवी म्हणाले कि, रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये. मी आमदार नसलो तरी चालेल पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी योगदान देणारा असा कोणताही उमेदवार चालेल, असेही सूर्यकांत दळवी यांनी म्हटले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्यावेळीही सूर्यकांत दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. परंतु आता त्यांच्या मुख्यमंत्रांच्या भेटीमुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश असल्याचे म्हंटले जात आहे.
Visit : bahujannama.com