नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअरटेल पेमेंट्स बँकेने ‘भरोसा सेविंगस अकाउंट’ सुरू केले आहे. या खात्याच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे खातेधारकास आपल्याकडे किमान 500 रुपये शिल्लक असले तरीही ५ लाख रुपयांपर्यंत पर्सनल ऍक्सीडेंट इन्शुरन्स मिळेल. त्याशिवाय जर खातेधारकास शासनाकडून जी सबसिडी मिळते ती त्यांनी या खात्यात ट्रान्सफर केली तर एअरटेल पेमेंट्स बँक त्यांना प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक देईल.
एअरटेलने का आणले भरोसा सेविंग्स अकाउंट
एअरटेलने दावा केला आहे की ‘भरोसा सेविंग्ज अकाउंट’ या अकाउंटला खूप विचारविनिमय करून मार्केटमध्ये आणले आहे. याचा मुख्य हेतू आहे की जे लोक बँकिंग सुविधांपासून अद्याप वंचित आहेत त्यांना या अकाउंटचा लाभ मिळावा. जाणून घ्या या अकाउंटबद्दल
१] एअरटेल पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना या योजनेद्वारे ५०० रुपये रुपये शिल्लक असले तरीही ५ लाख रुपयांपर्यंत पर्सनल ऍक्सीडेंट इन्शुरन्स मिळेल. मात्र त्यासाठी ग्राहकाला महिन्यातून कमीतकमी एकदा डेबिट ट्रान्झेक्शन करणे आवश्यक आहे.
२] खातेधारकास शासनाकडून जी सबसिडी मिळते ती त्यांनी या खात्यात ट्रान्सफर केली तर एअरटेल पेमेंट्स बँक त्यांना प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक देखील मिळेल.
३] या योजनेवर एअरटेल पेमेंट्स बँकेच्या अकाउंट सारखेच ४ टक्के व्याज मिळू शकेल.
४] या खात्यातून रोख रक्कम काढण्यासाठी ग्राहक देशातील कोणत्याही आधार अनबेल्ड पेमेंट सिस्टमची सुविधा ठेवणाऱ्या आउट्लेट्स मधून कॅश काढू शकतात.
visit : bahujannama.com