मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने आपली पहिली यादी घोषित केल्यानंतर शिवसेनेने देखील आपली पहिलीयादी घोषित केली आहे. या यादीत 70 जागांची घोषणा करण्यात आली. युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी शिवसेनेला 124 आणि भाजपला 164 जागा मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने आपली 125 उमेवारांची घोषणा केली आहे.
शिवसेनेच्या यादीत अपेक्षे प्रमाणे आदित्य ठाकरे, प्रदिप शर्मा यांच्या नावांचा समावेश आहे. तर सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, मुंबादेवी मधून पांडूरंग सपकाळ, रवींद्र वायकर जोगेश्वरी पूर्व मधून, जालन्यातून अर्जुन खोतकर, नाला सोपाऱ्यातून प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे वरळी मतदार संघातून लढणार आहेत.
वैभव नाईक यांना कुडाळ मधून तर, प्रतापराव सरनाईक ओवळा माजीवाड येथून, जयदत्त क्षीरसागर बीड मधून, संदीप भूमरे पार ठाणे मधून, पांडूरंग वरोरा शहापूर मधून, अनिल राठोड नगर शहर मधून, संजय शिरसाट औरंगाबाद दक्षिण मधून, विनोद घोसाळकर श्रीवर्धन मधून, एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी मधून, रमेश बोरनारे वैजापूरमधून, उल्हास पाटील शिरोळ, विशाल कदम गंगाखेड, योगेश कदम दापोली, भास्कर जाधव गुहागर, रमेश लटके अंधेरी पूर्व, अमशा पडवी अक्कलकुवामधून, निर्मला गावित इगतपुरीमधून, विजय पाटील वसईमधून,शाहजी बापू पाटील सांगोलामधून तर महेंद्र थोरवे कर्जतमधून, अनिल बाबर खानापूरमधून, हिकमत उधाण घरसावंगीमधून अशी उमेदवारी देण्यात आली आहे.
तर संतोष बांगर कळमनुरीमधून, राजेश शिरसागर कोल्हापूर उत्तरमधून, संग्राम कुपेकर चंदगड कोल्हापूरमधून, अजय चौधरी सेवरीमधून, सुजित मिचणेकर इचलकरंजीमधून, प्रिती संजय वडनेरामधून अशी संधी देण्यात आली आहे. राजश्री पाटील नांदेड दक्षिण, महेंद्र शेठ दळवी मुरुड मधून, नागेश अष्टेकर हतगावमधून, यामिनी जाधव भायखळामधून, चिंतामण राव पाटील एरंडोल पारोळा, विठ्ठल लोकरे गोवंडीमधून, पांडूरंग सपकाळ मुंबादेवीमधून अशी नावे उमेदवारी यादी आहे. वांद्रे पूर्व जागेची घोषणा करण्यात आली नाही.
Visit : bahujannama.com