बहुजननामा ऑनलाईन टीम – जिओ (रिलायन्स जिओ) आल्यानंतर बर्याच सेवा अगदी विनामूल्य झाल्या आहेत. जिओच्या वापरकर्त्यांना कमी पैशात अमर्यादित कॉल, अमर्यादित इंटरनेट सुविधा मिळते. परंतु जिओकडे आता एक नवा अॅप देखील आहे ज्याच्या साहाय्याने फोन मधील डेटा (फोटो, व्हिडिओ) ट्रान्सफर केले जाऊ शकतो. या अॅपचे नाव जिओस्विच आहे, जरी जिओचे बरेच फीचर्स केवळ जिओ सिम वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहेत, परंतु कोणताही अँड्रॉइड यूजर हा अॅप वापरू शकतो.
यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोर मध्ये जावून तेथे जिओ स्विच सर्च करा आणि आपल्या फोन मध्ये इंस्टॉल करा.
आता हे अॅप ओपन करा. अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला सेंड आणि रिसिविंग असे दोन पर्याय दिसेल.
जर तुम्ही एखाद्याला फोटो, व्हिडिओ, संपर्क, गाणी इत्यादी गोष्टी पाठवू इच्छित असाल तर सेंड वर क्लिक करा. आता तुमच्या समोर वेगवेगळे कॅटेगरी येतील, ज्यामध्ये व्हिडिओ, फोटो, अँप्लिकेशन्स , संगीत, फाइल्स, संपर्क, कॅलेंडरचा समावेश असेल.
यातील कोणत्याही कॅटेगरी वर क्लीक करा. उदाहरणार्थ जर तुम्ही फोटो या पर्यायावर क्लीक केला तर तुमच्या समोर फोनमधील सर्व फोटो दिसेल. आता जे फोटो पाठवायचे आहे ते निवडा आणि सेंड बटनावर क्लीक करा.
पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यांना कोणाला तुम्ही फोटो पाठवत आहे त्यांच्या फोनमध्ये रिसिव्हचा पर्याय ऑन पाहिजे. सेंड पर्यायावर क्लीक केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा डिवाईज नेम दिसेल. त्या नावावर क्लीक केल्यानंतर मिनिटातच फोटो सेंड होईल.
Visit : bahujannama.com