नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका गर्भवती महिलेस लैंगिक तस्करीपासून वाचवल्याबद्दल कॅब चालकाचे कौतुक केले जात आहे. कॅब चालकाला त्या महिलेसह वेश्यालयात जा असे सांगण्यात आले, परंतु त्याने त्रासलेल्या महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले. हे प्रकरण ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्स मधील आहे. या महिलेला वाचवण्यासाठी ब्रिटनचे पोलिस टॅक्सी चालक ताहिर महमूदचा सन्मान करणार आहेत. एका वृत्तासंस्थेनुसार रॉबर्ट एनेस्कू या महिलेस लैंगिक तस्करीमध्ये अडकवणाऱ्या पुरुषाला दोषी ठरविण्यात आले आहे.
या महिलेने सांगितले होते की ती मसाज काम करण्यासाठी आली होती, परंतु तिला लैंगिक काम करण्यास भाग पाडले गेले. ही महिला रोमानियाची रहिवासी असून तिला ब्रिटनमध्ये बंधक बनवण्यात आले होते. या महिलेला पोलिसांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये रेस्क्यू केले होते. पण कॅब चालकाची भूमिका नुकतीच समोर आली आहे.
पोलिसांचा एक व्हिडिओही समोर आला असून यात चालकाने महिलेला कसे वाचवले, हे दर्शविण्यात आले आहे. दोषी दोषी रॉबर्ट एनेस्कूला पोलिसांनी अटक केली होती. पण नंतर जामीन मिळताच तो पळून गेला. त्याच्या अनुपस्थितीत कोर्टाने त्याला ९ वर्षांची शिक्षा सुनावली.
Visit : bahujannama.com