बीड : बहुजननामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूक तोंडसावर आल्या असताना.शरद पवारांनी सातारा, कोल्हापूर पाटोपाट बीड मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्याशी संवाद साधताना मतदानाच्या दिवशी मतदान यंत्र तपासा.सरकार काहीही करू शकते.कार्यकर्त्यांनी सतर्क राहून मतदान यंत्रात काही गडबड तर नाही ना ? हे पाहावे. काही आक्षेपार्ह वाटले तर तत्काळ तक्रार करा अशा सूचना शरद पवारांनी दिल्या.
राष्ट्रवादी भवनात शुक्रवारी सकाळी ११ वाजता शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. पवार म्हणाले बीडसाठी योग्य उमेदवार दिला जाईल.कार्यकर्त्यांनी गटातटाचे राजकरण विसरून कामाला लागावे. तरच विजय निश्चित होईल.असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला.
सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्र समित्यांचा आढावा घेत चर्चा केली.पवार बोलताना म्हणले कि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाला मदत करावी. जिल्ह्याने राष्ट्रवादीवर व माझ्यावर भरपूर प्रेम केले आहे. भाजप सरकार मतदान यंत्रणांमध्ये काहीही करू शकते. त्यामुळे कार्यकर्तांनी सतर्क राहावे. या वेळी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, माजी आमदार अमरसिंह पंडित, उषा दराडे, सय्यद सलीम, संदीप क्षीरसागर आदी उपस्थित होते.