अकोला : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागताच आरोप- प्रति आरोपाच्या फैरी राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी पवारांवर नवीन आरोप केला आहे. तिहार तुरुंगात बंदिस्त असलेला कुख्यात डॉन छोटा राजन आणि ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल तोंड उघडेले तर पवार अडचणीत येतील.अशी भीती शरद पवारांना आहे. असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गोंदिया येथे प्रचार सभेत बोलताना म्हणाले कि तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या दोघांनी तोंड उघडले.तर अनेकांचे खरे चेहरे समोर येतील असा गर्भित इशारा दिला होता. त्यांचा निशाणा शरद पवारांकडे होता. त्यानंतर शरद पवार यांनी उस्मानाबाद प्रचार सभेत बोलताना मोदींना प्रतिउत्तर दिले.आमची कळ काढाल तर माफी नाही. असे प्रत्त्युत्तर पवारांनी दिले.
नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे एकमेकांचे ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरु आहे. सत्य काय आहे सर्व जनतेसमोर येणे गरजेचे आहे.त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे आव्हान स्वीकारून तिहारमधील बाबींचा खुलासा करावा.अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषेदेमध्ये बोलताना केली आहे.