मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी शरद पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी शरद पवार हे महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांच्या जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत. या बैठकांना १३ जूनपासून सुरुवात होणार आहे.
विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार हे कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्थानिक समस्या, विधानसभेसाठी संभाव्य उमेदवार अशा अनेक विषयांवर कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली जाणार आहेत अशी माहिती आहे. ‘लोकांना परिवर्तन हवं आहे. नवीन पिढीला निवडणूक प्रक्रियेत संधी दिली पाहिजे येत्या विधानसभा निवडणुकीत हा सर्व बदल करण्याची खबरदारी प्रदेशाध्यक्षांनी घ्यावी,’ अशी सूचनाही पवारांनी केली.
प्रत्येक पक्षात एक चित्र बघायला मिळते कि कार्यकर्त्यांनी राबायचं आणि नेत्यांच्या मुलांनी पदं घ्यायची त्यामुळे सामान्य कार्यकर्ते दुखावले जातात. याचा फटका सर्वच विरोधी पक्षांना बसल्याने शरद पवारांनी नवी योजना आखल्याचं बोललं जात आहे.
कोणत्या भागात कधी बैठक होणार ?
कोकण – १३ जून
उत्तर महाराष्ट्र – १४ जून
पश्चिम महाराष्ट्र – १५ जून
विदर्भ -२१ जून
मराठवाडा – २३ जून