मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केली होती. यानंतर पार्थ यांच्या मागणीवर आजोबा शरद पवार यांनी चांगलीच कानउघडणी केली. मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, अशा शब्दात पवारांनी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनीही आता या प्रकरणावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अफवा पसरवण्यापेक्षा आणि अन्य पक्षात संवाद साधण्यापेक्षा स्वतःच्या पक्षात संवाद साधण्याची गरज! pic.twitter.com/nIcw8cxYHt
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 13, 2020
पार्थ पवार यांच्या संदर्भात प्रसारमाध्यमांसमोर मत प्रदर्शन करणाऱ्या शरद पवार यांनी व्यक्त केलेला राग हा नक्की कशाचा होता याचा खुलासा करावा अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिराला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून ? निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे.
निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, स्वत:च्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारलं वाचून व ऐकून धक्का बसला, एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितलं. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिराला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून ? असा खोचक सवाल त्यांनी शरद पवार यांना विचारला आहे.