बहुजननामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची कन्या सुहाना खान (Suhana Khan) ही सोशल मीडिया वर चांगलीच ऍक्टिव्ह असते. सुहानाने आपला रंग आणि उंची सांगणारी एक पोस्ट केली आहे जी सध्या चर्चेचा विषय ठरलेली आहे. सुहानाला तिच्या दिसण्यावरून खूप वेळेस ट्रोल केलेले आहे. व अशाच ट्रोलला कंटाळून सुहाना खान (Suhana Khan) म्हणते की मला माझ्या रंगाबद्दल मला गर्व आहे.
सुहानाने सोशल मीडियावर पहिल्यांदाच या गोष्टींबद्दल वाच्यता केली आहे. सुहाना तिच्या पोस्ट मध्ये म्हणते की मी बारा वर्षाची असतानाच माझा रंग ब्राऊन व उंची कमी आहे म्हणून मला ट्रोल केल्या गेले. मी बेढब आहे अशा प्रतिक्रिया दिल्या गेल्या. आणि समाजातील उच्चभ्रू व सुशिक्षित समजणार्यांनी मला असे म्हटले आहे. पण माझा रंग ब्राऊन आहे व उंची 5.3 इंच आहे याचा मला अभिमान आहे. तसेच हे फक्त माझ्यासाठीच नाही तर देशातील हजारो युवक व युवती ज्याना अशाप्रकारे ट्रोल केल्या जाते त्यांसाठी आहे.
दुःख या गोष्टीचे वाटते की आपण सर्व भारतीय आहोत आणि ब्राऊन हे भारतीय असल्याचे एक लक्षण आहे हे चांगल्या शिकलेल्या लोकांनाही लक्षात येत नाही ही दुर्दैवी बाब आहे. रंग गोरा किंवा उंची 5.7 इंचअसणे म्हणजेच सुंदर असतात असे म्हणणाऱ्यांचा मला खेद आहे असेही सुहाना म्हणाली. याबरोबरच सुहानाने वर्णभेदाला थारा देऊ नये अशी अपील देखील केली.