मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – भाजपला रोखण्यासाठी एकमेकांचे शत्रू असलेले राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीतील घटकपक्षांचा पक्षविस्तार चालू असताना राष्ट्रवादी आणि शिवसेनेने पक्षबांधणीकडे लक्ष दिले आहे.
शिवसेनेकडून ज्येष्ठ नेत्यांची नावे देणार असल्याचे सांगितले जात आहे.शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील, आनंदराव अडसूळ आणि चंद्रकांत खैरे हे लोकसभा निवडणुकीत पराजित झाले. अशातच शिवसेनेचे दिग्गज नेते रामदास कदम, दीपक केसरकर, सुनील राऊत आणि दिवाकर रावते या नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे.
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असून ते पक्षसंघटनेला पूर्णवेळ पाठिंबा देणे शक्य नसून त्याची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांवर देतील, अशी माहिती मिळत आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारे नेते शिवसेनेकडे असून तेच नेते आता शिवसेनेला घरा-घरात आणि गावा-गावात पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.
Visit : bahujannama.com