मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई मधील वांद्रे परिसरात असणाऱ्या शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यासमोरील इमारतीस भीषण आग लागली. त्या आगीत एका २२ वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू झाला आहे. वांद्याच्या बँडस्टँड परिसरात सी स्प्रिंग या इमारतीला आग लागली होती, आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आल्यावर ही आग विझवली.
Fire at Sea Springs building at Bandstand Bandra @SachinKalbag pic.twitter.com/cbZ3A32lyE
— ᔕᗩIᑎT ᗷOᒍᗩᑕK (@ThBuckStopsHere) March 19, 2020
२२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे, तिचे नाव ईव्हाना मॉरिस असे आहे. सिफ्रा जाफरी असं ३८ वर्षांच्या महिलेचं नाव आहे. सिफ्रा ९० टक्के भाजली असून तिला भाभा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ही इमारत मन्नत बंगल्यासमोर आहे. मन्नत बंगला हा शाहरुख खानचा आहे. रहिवासी इमारत असल्यामुळे ६ व्या मजल्यावर कोणीतरी अडकल्याची भीती होती.
Bandra #BandStand Sea Springs building on fire. Six floor building. People could be inside the building..#Mumbai video by my frnd @kashifkhusro pic.twitter.com/MCpKALCH2s
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) March 19, 2020
आग विझवल्यानंतर दोघांना बाहेर काढण्यात आले.या आगीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान, आग नेमकी कशी लागली याचा आता पोलीस तपास करत आहे पण, अशा मोठ्या इमारतीला आग लागेपर्यंत तिथे सुरक्षा व्यवस्था नव्हती का ? असा सवाल आता उपस्थित होतो आहे.